मुंबई : गाडी हवी, फ्लॅट हवा, हे हवं... ते हवं... सासरकड्यांचा मुलीचा छळ. रोज मुलीचे हाल पाहणाऱ्या बापाने उचललं टोकाचं पाऊल. पोटच्या लेकीच दुःख पाहून रोज मरण्यापेक्षा फासाला जवळ करून बापाने केली आत्महत्या. ही हृदयद्रावक घटना नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शहापूरमध्ये घडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना इथेच थांबली नाही. वडिलांनी केलेली आत्महत्या मुलीला सहन न झाल्यामुळे बापाशेजारीच लेकीने प्राण सोडले. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


देगलूर तालुक्यातील सुगावमधील माधुरी शंकर भोसले हिचा आठ महिन्यापुर्वी विवाह झाला. हा विवाह मुखेड तालुक्यातील उंद्री येथील संदीप वडजे सोबत झाला होता. संदीप पुणे येथे कंपनीत नोकरी करत होता. लग्नानंतर पती संदीप आणि सासरच्या मंडळींनी गाडी आणि फ्लॅट घेण्यासाठी 5 लाखाची मागणी माधुरीकडे करत तिचा शारिरीक आणि मानसिक छळ सुरू केला.


सासरकडच्या सगळ्या मागण्या पूर्ण करु शकत नसल्याच माधुरीच्या वडिलांनी सांगितलं. शंकर भोसले यांनी अगोदरच मुलीच लग्न कर्ज काढून केलं ते कर्ज फिटलं नाही आता पाच लाख कुठून आणू म्हणून चिंतेत होते. सोमवारी रात्री मुलीच्या सासरकडची मागणी पूर्ण करु शकत नाही म्हणून शंकर यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वडीलांनी आपल्यामुळे आत्महत्या केल्याचं दुखः माहेरी असलेल्या माधुरीला सहन झाले नाही आणि तिने वडीलांच्या मृतदेहाची शेजारीच प्राण सोडले. 


या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. ही घटना मन हेलावणारी आहे. आजही लेकीच्या बापाच दुःख काही कमी झालेलं नाही हे स्पष्ट होतं.